आमीर खानचा ‘दंगल’ : बेगडी दिखाव्याचं सुबक पॅकिंग
‘दंगल’मध्ये शेवटी ‘राष्ट्रगीत’ आहे. देशद्रोहाचा आरोप ऐकून कंटाळलेल्या आमीरने कदाचित सूड म्हणूनच ही योजना केली असावी! इतर मसाला चित्रपटांच्या यशापेक्षा ‘दंगल’चं वेगळेपण असं की, मसाला चित्रपटांना नाक मुरडून समाजाची अभिरूची जिवंत ठेवण्यात आनंद मानणारा एक छोटासा तरी वर्ग शिल्लक असतो. ‘दंगल’च्या बाबतीत मात्र विचारी प्रेक्षकसुद्धा भारावून गेले आहेत, ही अधिक चिंतेची बाब आहे!.......